उड्डाण पुलाजवळ भीषण अपघात, ३ जण जागीच ठार

0

लोकशाही न्युज नेटवर्क

मुंबईतील परळ येथील उड्डाण पुलाजवळ आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वार तिघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन तरुणींचा समावेश आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला ट्रिपल सीट बाईक चालवणे तिघांच्या जीवावर घेतला आहे भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण दुचाकी वरील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता पोलिसांनी या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे.

डंपरला दिली धडक
समोर आलेल्या माहितीनुसार दोन तरुणी आणि एक तरुण (एमएच 01 ई.के 9839)हे या दुचाकीवरून जात असताना गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि भरधा वेगात नियंत्रण सुटलेली ही दुचाकी समोरून येणाऱ्या (एमएच 03 सी.पी.4142) या डंपरच्या उजव्या बाजूला आदळली दुचाकी चा वेग इतका होता की या डंपरचा पुढचा भाग आत गेला असून या अपघातामध्ये दुचाकी वरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. ओव्हर टेकिंग आणि ओव्हर स्पीड मुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शी अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र याबद्दलची ठोस माहिती अजून मिळालेली नाही.

अपघातामुळे वाहतूक कोंडी
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे समजू शकलेली नाही मात्र भोईवाडा पोलिसांचे एक पथक या अपघाताचा आढावा घेत असून नेमकं काय घडलं याबद्दल सविस्तर माहितीचा तपास करीत आहे या अपघातामुळे अरुंद उड्डाणपूलावर वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर अपघातग्रस्त वाहने उड्डाण पुलावरून बाजूला काढले अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला काढल्यानंतर येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली होती .

Leave A Reply

Your email address will not be published.