महापालिकेच्या ७८८ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

0

जळगाव : – महापालिकेतील ७८८ कार्यरत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून त्यांच्या डिसेंबर महिन्याच्या पगारात सातवा वेतन आयोगानुसार वाढ करून पगार त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. तसेच उड्डाण पदोन्नती धारक ९३ कर्मचाऱ्यांनाही १५ दिवसात सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील लवकर वेतन आयोगाचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरु आहेत.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा विषय सोमवार दि. १५ जानेवारी रोजी खऱ्या अर्थाने मार्गी लागला असून डिसेंबर महिन्याच्या वेतनात हा वेतन आयोग लागू करून पगार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. महापालिकेच्या विशेष लेखा परिषणात ११६६ कर्मचाऱ्यांची भरती व पदोन्नत्यांवर ठपका ठेवण्यात आला होता.

मनपा प्रशासनाने उड्डाण पदोन्नती झालेले कर्मचारी वगळता ७८८ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू केला असून उड्डाण पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी कार्यरत ९३ कर्मचाऱ्यांना देखील महिना अखेर पर्यंत सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.