मनपाच्या ५४ अनुकंपाधारकांना नियुक्ती आदेश

0

जळगाव : – महापालिका प्रशासनाकडून मकर संक्रातीच्या दिवशी मनपा अनुकंपधारकांच्या प्रतिक्षा यादीमधील ५४ उमेदवारांनानियुक्ती आदेश देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या या उमेदवारांना अखेर दि.१५ रोजी नियुक्ती आदेश मिळाल्याने त्यांच्यासह त्यांच्या कुटुबियांमध्ये हर्षोल्लासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मनपा अनुकंपधारकांच्या प्रतिक्षा यादीत १२५ उमेदवार होते. त्यापैकी १७ उमेदवार विविध कारणास्तव अपात्र ठरले असून १०८ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी गट क मध्ये ३६ उमेदवारांना तर, गट ड मध्ये १८ उमेदवारांना महापालिकेतील विविध पदांवर नियुक्ती देण्यात आली.

आमदार सुरेश भोळे यांच्या अध्यक्षतेखाली एक छोटेखानी कार्यक्रम घेवून हे नियुक्ती आदेश वितरणी करण्यात आले. यामध्ये गट क मध्ये लिपीक-२३, वाहन चालक -५, कनिष्ठ अभियंता स्थापत्य २, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी १, कनिष्ठ अभियंता विद्युत -१, रचना सहाय्यक १, स्वच्छता निरीक्षक- १, संगणक तंत्रज्ञ १, दुरध्वनी चालक १ आणि गट ड मध्ये शिपाई १४, मलेरीया कुली- २, भालदार चोपदार १, माळी – १ आदी पदांवर नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. यावेळी आमदार सुरेश भोळे, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत, उपायुक्त अविनाश गांगोडे, मुख्य लेखा परिक्षक मारुती मुळे, मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे, सहा आयुक्त गणेश चाटे, सह आयुक्त अभिजीत बाविस्कर, सह आयुक्त अश्विनी गायकवाड, वरिष्ठ लिपिक अर्चना वाणी आदींच्या हस्ते हे नियुक्ती आदेश देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.