वरणगाव : – वरणगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गावातील एका वाड्यात सुरु असलेल्या जुगार अड्डूयावर धाड टाकली. याठिकाणाहून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ७ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, प्रमोद कंखरे, प्रशांत ठाकूर, विजय बावस्कर यांचे पथक गस्त घालत असताना त्यांना पिंपळगाव बुद्रुक येथील एका वाड्यात काही जण जुगार खेळताना आढळून आले. त्यामध्ये सुपडू बावस्कर (वय ४१), समाधान चव्हाण (वय ४५), प्रकाश बावस्कर (वय ४०), विनोद चव्हाण (वय ४५), शुभम तळेले (वय ३२), अर्जुन बेंडाळे (वय ४५), ज्ञानदेव मावळे (वय ६०) हे संशयित सार्वजनिक ठिकाणी पत्ता खेळतांना आढळून आले. त्यांचे अंग झडतीमध्ये ७ हजार ८३० रुपये जप्त करण्यात आले. तसेच जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याबाबत फिर्याद पोहेकॉ प्रशांत ठाकूर यांनी दिली. पुढील तपास एपीआय भरत चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश देशमुख हे करीत आहे.