करियर गायडन्स या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव या कार्यालयामार्फत शुक्रवार 13 जानेवारी, 2023 रोजी दुपारी 12 ते 12.30 या वेळेत मॉडेल करिअर सेंटर द्वारा जॉब रिलेटेड करियर गायडन्स या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या मार्गदर्शन सत्रात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे मॉडेल करिअर सेंटर द्वारा, कु. सीमा शर्मा, यंग प्रोफेशनल या मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन meet.google.com/jnx-hjrr-mfb या गुगल मिटवर करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक/युवतींनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.