भारतीय हिंदू गोरबंजार समाज कुंभ मेळाव्यासाठी अहोरात्र झटताहेत हजारो हात !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रत्येक समाजाला आपल्या समाजाप्रती अभिमान असतो . समाजाच्या उन्नतीसाठी समाजातील नेते आपले सर्वस्व पणाला लावून समाज कसा विकासाभिमुख होईल याकडे त्यांचे कायम लक्ष लागलेले असते. तसेच समाजासाठी आपण काहीतरी देणे लागती हि जाणीव प्रत्येक समाजातील व्यक्तींमध्ये असते. यातील प्रत्येकजण आपापल्यापरीने समाजासाठी फुल नाहीतर पाकळी देण्याचं प्रामाणिक प्रयत्न करीत असतो . देशातील हिंदू गोरबंजार समाज हा पूर्वकाळापासून हिंदू धर्मियांचा अविभाज्य भाग आहे असे म्हटल्यास वावगे ठरून नये. गोर बंजारा समाजाला आपली एक विशिष्ट रूढी परंपरा चालीरीती असून त्या आजही पाळल्या जातात.

बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून ‘गोर’ हा एक प्राचीन क्षत्रिय वंश आहे. त्याचा हिंदीमध्ये ‘गौर’ तर इंग्रजीमध्ये असा Gour/Gor असा उल्लेख होतो. गौर या शब्दाचा मराठीत ‘गोर’ असाही उल्लेख होतो. गौरवंशीय लोकांना गोरबंजारा असे म्हटले जाते. हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा एक महत्त्वाचा घटक होय.भारतीय विविधतेतील एक स्वतंत्र संस्कृती जोपासणारा समाज म्हणून बंजारा समाजाकडे बघितल्या जाते. काटक, लढवय्या, साहसी व निसर्गप्रेमी अशी त्यांची खरी ओळख. त्यांचे पुर्वीचे मुख्य स्थान राजपुताना, मारवाड मानले जाते. मोहम्मद घोरीच्या आक्रमणानंतर राजपुतानाचे जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे गौर बंजारा समुह व उपसमुहाच्या अनेक टोळया राजस्थानमधून दक्षिण मध्य, उत्तर भारतातील काही राज्यामध्ये तर काहींनी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश मध्ये येऊन वेगवेगळ्या नावांनी राहू लागली. महाराणा प्रताप सोबत यातील गौर बंजारा टोळ्या जंगलात गेल्या आणि जंगलात आपले बस्तान त्यांनी बसविले. भारतात वेगवेगळ्या राज्यांत, भौगोलिक प्रदेशात आपल्या विविध व्यवसायावरून गौर-बंजारा’, ‘गोरमाटी’ , ‘लमाणी’, ‘लभाणा’ , ‘बाजीगर’, ‘नायक’ , राजपूत बंजारा , ‘बामनिया बंजारा’ इत्यादी नावाने ओळखला जातो. संपूर्ण भारतात बंजारा हा समाजगण सर्वत्र विखुरलेला असून भारताच्या अगदी कानाकोपऱ्यांपर्यंत त्यांच्या स्वतंत्र वसाहती आहेत.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे २५ जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान अखिल भारतीय हिंदू गोरबंजार समाज कुंभ मेळाव्याचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आले. या महाकुंभ मेळाव्यासाठी हजारो सर्व जाती धर्मियांचे लोक मोठ्याप्रमाणात मेळा यशस्वीतेसाठी झटत असून मेळ्यासाठी कुठलीच उणीव राहणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतली जात आहे.

या कुंभ मेळ्याचे ध्वजारोहण 8 रोजी उत्साहात झाले. कुंभाचा हा कार्यक्रम फक्त धार्मिक नसून हिंदू धर्माच्या रक्षणासाठी व देशासाठी असल्याचे प्रतिपादन प.पू.बाबूसिंग महाराज पोहरागड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. प्रमुख संत ,महात्मे व मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत हे ध्वजारोहण संपन्न झाले.

अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना – नायकडा समाज कुंभ 25 ते 30 जानेवारी दरम्यान गोद्री ता .जामनेर येथे भव्य प्रांगणात होत आहे. श्री गुरुनानक देवजी साहेब संगत व श्री बालाजी भगवान महाप्रसाद भंडार निमित्त संपूर्ण भारत भर विखुरलेल्या हिंदू गोर बंजारा व लबाना – नायकडा समाजाला एकत्र आणून सनातन विचार, योग्य दिशा व प्रेरणा देण्यासाठी, आपला इतिहास, परंपरा,धर्म व संस्कृती संवर्धन व संगोपन करण्यासाठी या कुंभाचे आयोजन आहे.

8 रोजी कुंभाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संत गोपाळ चैतन्यजी बाबा ,संत सुरेश बाबा,संत रामसिंगजी महाराज,संत यशवंतजी महाराज,महंत जितेंद्र महाराज ,संत रायसिंगजी महाराज,संत शामचैतन्यजी महाराज,महामंडलेशवर जनार्धन हरी महाराज ,प.पू . हिम्मतजी महाराज,वे.शा. स.साहेबरावजी शास्त्री, प.पू. विशुध्ददा नंदजी महाराज,संत सर्व चैतन्य महाराज ,प.पू.दिव्य चैतन्य महाराज, प.पू शांती चैतन्य महाराज,अ. भा.धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले,क्रीडा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरीष महाजन उपस्थित होते .
यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजासाठी लाखोंच्या संख्येने एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे.

हिंदू गोरबंजार समाज कुंभचे आकर्षण
पारंपारिक पेहरावात पुरुष व महिला या मेळ्यात दिसणार आहेत. देशाच्या कान्याकोपऱ्यातून समाजबांधव या कुंभ मेळाव्यानिमित्त एकत्र येणार आहे. यावेळी समाजाच्या पूर्वकाळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा याची माहिती भव्य चित्र प्रदर्शनातून देण्यात येणार असल्याने हे याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

25 ते 30 जानेवारी दरम्यान होणाऱ्या कुंभ मेळ्यात प्रदर्शनीत – इतिहास (महापुरुष, संत व वास्तू),वेशभूषा(पारंपारिक), भाषा – पुस्तके,गीत,कथा,धार्मिक स्थळे, संस्कृती दर्शवणारी भव्य प्रदर्शनी असणार आहे. देशभरातील प्रख्यात संत महापुरुषांचे आशीर्वाद, प्रबोधन, प्रवचन,परंपरा ,चालीरिती चे व्यासपीठावर सादरीकरण होणार आहे.

असा आहे कुंभ मेळाव्याचा दैनंदिन कार्यक्रम

25 ते 30 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या कुंभात सकाळी 9 ते रात्री 10 वाजे दरम्यान भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. 25 रोजी पल्ला,मूर्ती स्थापना, सांस्कृतिक कार्यक्रम, संत प्रवचन , संत रामरावबापू अमृतवाणी 26 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, संत प्रवचन संत सेवालाल अमृतलीला , संत रामरावबापू अमृतवाणी. 27 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, संत प्रवचन संत सेवालाल अमृतलीला ,संत रामरावबापू अमृतवाणी 28 ला पल्ला, सांस्कृतिक कार्यक्रम, संत प्रवचन संत सेवालाल अमृतलीला , संत रामरावबापू अमृतवाणी ,29 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, संत प्रवचन संत सेवालाल अमृतलीला ,संत रामरावबापू अमृतवाणी आणि 30 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, संत प्रवचन संत सेवालाल अमृतलीला ,संत रामरावबापू अमृतवाणी रात्री 10 ला समारोप होणार आहे.

दरम्यान गोर बंजारा समाजाच्या या कुंभ मेळ्यासाठी समाजबांधवांसह सर्वजातीधर्मियांचे कार्यकर्ते मेहनत घेत आहे. स्वतः ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हेदेखील याकडे लक्ष ठेऊन असून आरोग्य दूत रमेशवर नाईक यांच्याकडे या गोरबंजारा समाज कुंभाची धुरा सोपविण्यात आली असून ते याची जबाबदारी अतिशय चपखलरित्या पार पाडत आहे. २५ जानेवारीपासून होणाऱ्या या महाकुंभ मेळाव्याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.