लोकशाही न्यूज नेटवर्क
रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सेवाचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवाराकरिता नाव नोंदणी, शैक्षणिक पात्रता वाढ, अनुभवाच्या प्रमाणपत्राची नोंदणी, नुतनीकरण इत्यादी सेवा विभागाच्या वेबसाईटवर विनामुल्य उपलब्ध आहे.
जळगाव जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रतेची नोंद विभागाच्या वेबसाईट www.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर जावून आपल्या नावाची नोंद करण्यात यावी, या विभागाच्या इतर सेवाचा ( रोजगार मेळावे, ईपीपी प्रशिक्षणार्थी, कौशल्य विकास प्रशिक्षणार्थी) यांनी देखील लाभ घ्यावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र वि.जा. मुकणे यांनी केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.45 ते संध्या 6.15 या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. मुकने यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.