उद्योजकांनी रोजगार प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांसाठी दहावी पास ते पदवीधारक उमेदवारासाठी सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येते उदयोजकाच्या मागणीनुसार त्यांच्या कार्यालयात / कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देऊन या योजनेतुन तीनशे ते एक हजार रुपये पर्यत शैक्षणिक पात्रतेनुसार विदयावेतन शासनामार्फत देण्यात येते.

जळगाव जिल्हयातील ज्या उदयोजकाना / कंपन्यांना योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे. अशा उदयोजकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव वि. जा. मुकणे यांनी केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.45 ते संध्या 6.15 या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.