चाळीसगावकर धुळीमुळे हैराण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव चाळीसगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील धुळीमुळे दुकानदार व नागरिक हैरान झालेले आहेत. त्यामुळे नगरपालिकेने तात्काळ उपायोजना करावी अखिल भारतीय मराठा महासंघाची , मुख्याधिकारी चाळीसगाव नगरपालिका यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की ,चाळीसगाव शहरातील मुख्य रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढून शहरातील नागरिक व दुकानदार हैराण झाले असून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. या धुळीमुळे चाळीसगावातील सुज्ञ नागरिक नगरपालिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. तसेच केंद्र सरकारने कोरोनाची चौथी लाट येण्याची संकेत दिले आहे. त्यामुळे गर्दीच्या काही ठिकाणी मास्कचे निर्बंध लावले आहेत. या गंभीर बाबीचा विचार करता चाळीसगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण शहरात योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबतची तक्रार शहरातील दुकानदार व सुज्ञ नागरिकांनी मराठा महासंघाकडे केली आहे. चाळीसगाव नगरपालिकेने तात्काळ शहरातील मुख्य रस्त्यावरील धुळीमुळे दुकानदार व नागरिक हैराण झालेले असल्यामुळे माती झाडून पाणी मारावे अशीतात्काळ उपयोजना करावी .अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा महासंघाच्या वतीने मुख्याधिकारी चाळीसगाव नगरपालिका यांना देण्यात आला आहे.
सदरचे निवेदनावर अध्यक्ष खुशाल बिडे, तालुका अध्यक्ष रमेश पाटील, महिला जिल्हा संघटक प्रतिभा पवार, युवक तालुका अध्यक्ष परमेश्वर पाटील, शहर उपाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष सिद्धांत पाटील, शहर संघटक रवी पाटील, एडवोकेट दीपक वाघ, सुदाम पवार, अनिल गवळी आदींच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.