मोठी बातमी ! राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना अटक

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक (Jitendra Awhad Arrested) करण्यात आल्याचे वृत्त आहे.  ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा (Har Har Mahadev Movie) शो राष्ट्रवादीने बंद पडल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. त्यात एका प्रेक्षकाला मारहाणही झाली. याच प्रकरणामध्ये आव्हाड यांच्यासहीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना पोलीस स्थानकामध्ये बोलवून घेण्यात आलं आणि नंतर अटक करण्यात आली.

दुपारच्या सुमारास विवीयाना मॉल ज्या वर्तकनगर पोलीस स्थानकाअंतर्गत येतो त्या पोलीस स्थानकामध्ये आव्हाड यांना बोलवण्यात आलं. त्यानंतर त्या ठिकाणी ठाण्याचे डीसीपी पोहोचले आणि त्यांनी आव्हाड यांना तुम्हाला अटक करण्यात येत असल्याची माहिती दिली. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सध्या वर्तकनगर पोलीस स्थानकाबाहेर आहे. आव्हाड बाहेर येईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली असून परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.