Jio ची खास नवी ऑफर; 5 जीबी डेटा वापरा आणि पैसे नंतर भरा

0

मुंबई:

आजच्या आधुनिक युगात  मोबाईल आणि इंटरनेट डेटा या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक गरजांच्या यादीत मोडतात. तसेच भारतात दिवसेंदिवस इंटरनेट डेटाचा खप वाढतच आहे. अशा लोकांसाठी जिओ कंपनीने  एक खास ऑफर आणली आहे. यामध्ये तुम्ही आज 5GB डेटा वापरून त्याचे पैसे दुसऱ्या दिवशी भरू शकता. जिओची ही ‘इमर्जन्सी डेटा लोन सर्व्हिस’ चांगलीच लोकप्रिय ठरत आहे.

1 GB पॅकमध्ये हे डेटा लोन उपलब्ध आहे. 1 GB च्या प्रत्येक पॅकची किंमत 11 रुपये इतकी आहे. एका युजरला 5 GB पर्यंतचा डेटा उधारीवर घेण्याची मुभा आहे. या डेटा प्लॅनचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे एक्टिव्ह प्लॅन असला पाहिजे. तुमचा चालू डेटा प्लॅन जोपर्यंत वैध असेल तोपर्यंत उधारीवर घेतलेला डेटा प्लॅन सुरु राहील. या प्लॅनमुळे जास्त इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांना फायदा होईल.

हा  डेटा लोन घेण्यासाठी तुम्हाला MyJio App वर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला मेन्यूमध्ये जाऊन इमर्जन्सी डेटा लोन हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर Activate Now वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेटा लोन मिळेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.