पंतप्रधान पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

0

चोपडा,  प्रतिनिधी

तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेकडे पाठ फिरवलेली असून, १२ महिन्यानंतर मागील वर्षीचे सन 2020-21 चे पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नसल्यामुळे या योजनेकडे दुर्लक्ष होत आहे.

वक्तशीरपणा परतफेड करून सोसायटीच्या माध्यमातून कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सोसायट्यांनी पीक विम्याचे लाभ देण्याचे प्रकरण तयार करूनही दुसऱ्या वर्षी अखेर ३१/६ ला पिक विमा रक्कम न मिळाल्याने शेतकरी नाखूष आहेत.खान्देशात शेतकरी ऑनलाईन पीक विमा भरण्याच्या भानगडीत पडायला तयार नाही.परिणामी देशात सर्वात कमी फायदा उचलण्यात खान्देश आघाडीवर राहील.विमा कंपनीचे निकष आणि सहकारी धोरण यामुळे पंतप्रधान पिक विमा योजना अनेक सोसायट्यांनी बासनात गुंडाळलेली आहे.15 जुलाई अंतिम मुदत असली तरी शेतकरी या योजनेत प्रतिसाद देताना दिसत नाही.  शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत असून पेरण्या देखील रखडलेल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.