जी. एच. रायसोनी महाविद्यालयाला ‘थ्री.फाईव्ह’ स्टार रेटिंग

0

जळगाव,;- शहरातील नामांकित स्वायत्त जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाला केंद्रीय मानव संसाधन विकास, केंद्रीय शिक्षण मंत्रालय व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत महाविद्यालयात वर्षभर घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे परीक्षण करून नुकतेच भारत सरकारने ‘थ्री.फाईव्ह’ स्टार रेटिंग’ देऊन सन्मानित केले. रैंकिंगमध्ये भारतातील ७,५१४ संस्थांनी सहभाग नोंदविला होता. यात जी. एच. रायसोनी महाविद्यालयाला ४५४ वे स्थान मिळाले आहे. असे मानांकन मिळविणारे रायसोनी महाविद्यालय हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे.

तंत्रशिक्षणात रायसोनी इन्स्टिट्यूट सतत नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या विकासाचा आलेख नेहमीच उंचावत असते. याचाच एक भाग म्हणून जी. एच. रायसोनी महाविद्यालयात केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत कार्यरत असणाऱ्या ‘इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल’ या विभागाने रायसोनीच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक नवनवीन उपक्रम राबविले होते. त्यात इंडस्ट्री ४.०, स्टार्ट-अप, एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट, डिझाईन थिंकिंग, क्रिटीकल थिंकिंग, पेटेंट फायलिंग यासारख्या आधुनिक विषयांची चर्चासत्रे व कार्यशाळा भरविण्यात आल्या होत्या. ‘या सर्व उपक्रमांचे ऑल इंडिया कॉन्सिलच्या तज्ञ समितीने परीक्षण करून थ्री.फाईव्ह’ स्टार रेटिंग’ देवून गौरविले. महाविद्यालयाच्या वार्षिक कामगिरीवरून हे रँकिंग ठरवले जाते.

विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता व उद्योजकता या गुणांना चालना देण्यासाठी महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केल्यामुळे हे ३.५ स्टार रेटींग प्राप्त झाले असून जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या दिशादर्शक मार्गदर्शन व नेतृत्वाखाली हे यश मिळाले आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात संपूर्ण भारतातून असंख्य महाविद्यालयांचा यात सहभाग होता. यापैकी महाराष्ट्रातून काही महाविद्यालयांना ३.५ स्टार रेटींग मिळाले असून उत्तर महाराष्ट्रातील जी. एच. रायसोनी महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय या रेटिंगने सन्मानित करण्यात आले आहे. या यशामुळे शिक्षण क्षेत्रात रायसोनी इन्स्टिट्यूटची मान आणखी उंचावली असून जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी व कार्यकारी संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.

 

राष्ट्रीय हॅकेथॉन मध्ये यश

मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन’ स्पर्धेत जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत देशात प्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रीय स्तरावर आपल्या महाविद्यालयाचा ठसा उमटवला आहे. केरळ व इंदोर या नोडल सेंटरवर संगणक अभियांत्रिकी विभाग व स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेत रोख एक लाख, इंटर्नशिपची संधी, १० लाखांपर्यंत स्टार्ट-अप सीडफंड, राष्ट्रीय स्तरावर उत्पादन प्रदर्शित करण्याची, तसेच आगामी आंतरराष्ट्रीय हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी या संघाला मिळाली आहे.

संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलची स्थापना करण्यात आली असून पुढीलवर्षी पाचपैकी पाचही रेटिंग स्टार मिळवण्याचा आमच्या महाविद्यालयाचा मानस असून कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित, ‘नॅक’ अधिस्वीकृत आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) मान्यताप्राप्त स्वायत्त रायसोनी महाविद्यालय हे इनोव्हेशनच्या बाबतीत सातत्याने अग्रस्थानी राहिले आहे. या कौन्सिलअंतर्गत गेल्या तीन वर्षात जवळपास १५० ऑनलाईन सत्रांचे आयोजन केले आहे. ‘आयपीआर’अंतर्गत महाविद्यालयाने १८९ कॉपीराईट, २४ पेटंट नोंद केले आहेत. महाविद्यालयाला सहा पेटंट, तसेच १८९ कॉपीराईट प्राप्त झाले आहेत. अवघ्या चार तासांत १०१ कॉपीराईट नोंद करण्याची कामगिरी फॅकल्टीने केली आहे. बौद्धिक मालमत्ता अधिकार, इनोव्हेशन, स्टार्टअप, उद्योजकता यावर महाविद्यालयात सातत्याने जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतात.” “स्मार्ट इंडिया हॅकेथॉन, आयबीएम नॅसकॉम हॅकेथॉन, मंथन हॅकेथॉन आदी स्पर्धांमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. एनपीटीईएल स्वयम, एनआयटीटीटी ऑनलाईन अभ्यासक्रम उपक्रमाचे सक्रिय सभासद असलेल्या रायसोनी महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य मानांकन पटकविले आहे, तसेच अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता व सर्व विभागप्रमुखांनी उत्कृष्ट कामगिरी करत विशेष समन्वय साधले असे संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.