जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कानळदा मार्गावरील बडे जडधारी शिवमंदिर स्थळी पंडित प्रदीप मिश्रा यांची श्री शिवपुराण कथा होत असून, त्यासाठी एकाच मार्गावर वाहतुकीचा भार येणाची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून प्रिंप्राळा रेल्वेगेटवरील भोईटेन्गराचा रेल्वे उद्दभपूल खुला होण्याची शक्यता आहे.
पुलाचे काम पूर्ण होत असले तरी, अद्याप शंभर टक्के पूर्ण झाले नाही. सध्या पुलाचे काम रंगं सुरु आहे. श्री शिवपुराण कथेसाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता,प्रशासन पूल खुला कारण्यासंबंधी पर्यायी व्यवस्थेचा विचार करीत आहे. त्यादृष्टीने सर्व चाचपणी केली जात आहे. श्री शिवपुराण कथा ५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यासाठी शहर आणि जिल्ह्यासह आजूबाजूच्या मोठ्याप्रमाणात शिवभक्तांची गर्दी होईल, पंडित मिश्रांच्या कथेसाठी लाखो भक्त एकत्रित येतात. जळगावमधील कथेसाठी सात दिवसांमध्ये ७ लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.