“हाई झुमका वाली पोर” फेम अभिनेत्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल…

0

 

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

सध्या लग्नसराई मध्ये अहिराणी गाण्यांची धूम बघायला दिसून येत आहे. मात्र त्यामध्ये गाजत असलेल्या अत्यंत लोकप्रिय गाण्याच्या कलाकारावर बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे. ते गाण दुसर कोणत नसून “हाई झुमका वाली पोर” या गाण्यातील अभिनेत्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.

एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याची तक्रार महिलेने केली आहे. पीडितेने ही तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केला. गेल्या ५ महिन्याच्या काळात विविध ठिकाणी नेत अत्याचार तसेच मारहाण केल्याचाही आरोप या पीडितेने केला. नाशिकरोड पोलिसांकडून या घटनेबाबत अधिक तपास केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.