बळीरामपेठेत भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील बळीराम पेठ येथे आज दुपारी 12 ते 4 वाजेच्या दरम्यान बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी अडीच लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील बळीराम पेठेत असलेल्या शिवप्रसाद अपार्टमेंट मध्ये स्वाती राजेंद्र मोहरील (वय 62) या एकट्याच राहतात, दरम्यान आज दुपारी त्या दुपारी 12 वाजेच्या सुमारास आपल्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या. त्या सायंकाळी आपल्या भावजयीसह घरी परतल्या, दरम्यान त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी चावी लावण्याच्या वेळी त्यांना तिथे कुलूप नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घरात प्रवेश करताच देवघरातील दोन्ही कपाट त्यांना उघडलेली दिसली व सर्व लॉकर मधील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला.

यावेळी त्यांना रोख रक्कम असलेली कागदी पिशवी, सोन्याच्या बांगड्या, चांदीच्या वस्तू दिसल्या नाहीत. तसेच कचराकुंडीत तोडलेले कुलूप आढळले. दरम्यान पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून फिर्याद दाखल केली आहे.

यामध्ये पन्नास हजार रोख, दीड लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, 36 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी सह चांदीच्या वस्तू असे सर्व मिळून 2 लाख 53 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.