ज्ञानवृक्षाच्या छायेत जामनेरची न्यू इंग्लिश स्कूल शाळा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

जामनेर ; जिल्ह्यात नावाजलेली व नावारूपाला आलेली संस्था म्हणजे शहरातील न्यु इंग्लिश स्कूल शाळा होय. शीलं परम् भूषणम’ हे संस्थेचे ब्रीद आहे. चारित्र्यसंपन्न विद्यार्थी सर्वसमावेशक शिक्षणाची जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे व ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने पथदशी वाटचालदेखील सुरू आहे. सर्वेच्या काळात यशस्वीतेची परंपरा अबाधित राखत गुणवत्तेचा दर्जा राखणाऱ्या काही जुन्या नामांकित शिक्षण संस्था आजही खान्देशात आपले अस्तित्व टिकवून आहेत.

या यादीत जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल चे मानाचे स्थान आहे. संस्थेची पथदर्शी वाटचाल स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी लोकमान्य टिळकांची स्वराज्याची चळवळ सुरू झाली होती. त्यात चतुःसूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यातील ‘राष्ट्रीयशिक्षण’ या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जामनेरमध्ये करण्याच्या हेतूने राजमल ललवाणी व बापूसाहेब दामले पुढे सरसावले. देशप्रेमी, दानशूर, शिक्षणप्रेमी लोकांना एकत्र आणले.

क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अर्थात दिनांक ३ जानेवारी १९१९ रोजी ‘जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी व न्यू उपक्रमशील शिक्षक इंग्लिश स्कूल, जामनेर’ची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यात  राजमल ललवाणी, प्रभाकर साठे, श्रीधर दामले, पंढरीनाथ दुधमांडे, आबाजीनाना पाटील, मनोहर धारिवाल,दीपचंद साबद्रा,  दादासाहेब धामणस्कर,  नारायण महाजन, गिरीश महाजन,  एल.इ.पाटील यांनी संस्थेची धुरा सांभाळली आहे.

संस्थेचे दिवंगत आबाजी पाटील यांच्या नियोजनबद्ध कार्यकाळात संस्थेची विशेष भरभराट झाली.न्यू इंग्लिश स्कूलच्या उभारणीनंतर परिसरात शिक्षणाचे स्त्रोत जानेवारी १९१९ दरम्यान सुरू झाले. गेल्या १०३ वर्षांच्या कालावधीत परिसरात शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकास झाला, त्याचे मोजमाप करणे खूप कठीण आहे. ज्ञानवंतांनी एक छोटेसे रोपटे लावले. ते हळूहळू विस्तारत गेले. कारण ज्ञानवंतांच्या कार्याला या

परिसरातील समाजधुरीण आणि जनसामान्यांनी मोठी घडवून साथ दिली. त्यामुळे हे सगळे घडू शकले. अर्थात, हे सगळे घडले ते या संस्थेच्या पदाधिकारी, कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नाने, स्वावलंबन व राष्ट्रीय भावना वाढीस लागावी म्हणून विविध शालेय उपक्रमांचे आयोजन सुरुवातीपासूनच करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीय शाळा म्हणून शाळेचा नावलौकिक झाला. विशेष म्हणजे भारतीय स्वांतत्र्य लढ्यात शाळेच्या अनेक शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनीही भागदेखील घेतला.

न्यू इंग्लिश स्कूलमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याने आदर्श नागरिक म्हणून आपली ओळख प्राप्त केली आहे. विविध क्षेत्रामध्ये म्हणजेच सरकारी खासगी, यशस्वी उद्योजक आदी क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा विशेष ठसा उमटवला आहे. न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर, क्रीडा क्षेत्रातही आपली नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर अनेक बक्षीस मिळवून आपल्या शाळेचे पर्यायाने तालुक्याचे नाव देखील उज्ज्वल केले आहे.मानव विकास अंतर्गत पुस्तकपेढी योजना शाळेत राबविली जाते.

त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा नरवाडे यांच्या मार्गदर्शनात उत्तम कामकाज सुरू आहे. गणेश धांडे यांनी वन्य प्राण्यांपासून शेतकत्र्यांच्या पिकांच्या संरक्षणासाठी तोफेसारखे उपकरण बनविले आहे. विशेष म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून अगदी अल्पखर्चात ही तोफ बनवण्यात आली आहे.

रूपेश बावस्कर यांनी कोरोना महामारीच्या काळात पथनाट्याद्वारे भारत सरकारच्या सामाजिक मंत्रालयाद्वारे जाहीर केलेल्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले. त्यामुळे त्यांचा सामाजिक मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत सन्मान करण्यात आहे. शिक्षक समुपदेशक सुरेश सुरवाडे यांनी परराष्ट्र मंत्रालय आयोजित ‘कनेक्ट टू रिकनेक्ट’ या शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमात भाग घेतला.

सामाजिक व सांस्कृतिक जाणिवांचा अभ्यास ज्या चालत्या फिरत्या प्रयोगशाळेत होतो ती म्हणजे ‘शाळा’ होय विद्यार्थ्यांनी विविध कलेत पारंगत होऊन आपले भवितव्य उज्ज्वल करावे, यासाठी सतत नवनवीन उपक्रम शाळांमध्ये राबविले जातात व विद्यार्थ्यांवर कळत-नकळत संस्कार केले जातात. अशा अनेक उपक्रमशील शाळांपैकी एक शाळा म्हणजे जामनेर तालुक्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल होय’.

शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक संदीप सपकाळ यांनी कोरोना महामारीच्या प्रतिकूल परिस्थितीत निर्माण झालेल्या समस्यांना तोंड देता यावे म्हणून इ.१० वीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी ऑनलाइन कार्यक्रम तयार केला.शिक्षका ज्योत्स्ना विसपुते यांची राज्य महिला आयोग सदस्यपदी सन २०१३ मध्ये नियुक्ती झाली, त्यांना सन २००८ मध्ये सावित्रीबाई फुले राज्य पुरस्कार मिळाला होता. झाले आहे.

जळगाव जिल्हा परिषदेने संस्थेला आदर्श संस्था म्हणून पुरस्कार दिला आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्यसाठी संस्थेने अगदी सुरुवातीच्या काळात शेंगोळा येथील तुळसामाता मंदिर परिसरात संत गाडगेबाबांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात नवस फेडण्याच्या निमित्ताने होणारे पशुहत्येचे प्रमाणदेखील कमी झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.