लोकशाही न्यूज नेटवर्क
जामनेर; चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदु नववर्षाच्या गुढीपाडवा सणाच्या शुभदिनी ब्राह्मण संस्थेच्या वतीने प्रथमच शहरातील नगारखाना भागातील श्री. दत्त मंदिर येथे श्री. रामायण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २-४-२०२२ पासून ते दि. ९-४-२०२२ पर्यंत वेळ ४-०० ते ६-३० वाजेपर्यंत आपण धुळे येथील प्रसिद्ध प्रवचनकार प. पु. निलाताई रानडे यांच्या सुश्राव्य वाणीत प्रभु रामचंद्रावरील रामायण सादर केले जाणार आहे. तरी या भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमात नागरिकांनी व ज्ञाती बांधवांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा. असे आवाहन ब्राह्मण संस्थेचे पदाधिकारी यांनी केले आहे.