जुन्या पेन्शनसाठी जामनेर तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा संप…

0

 

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

“एकच मिशन जुनी पेन्शन” या घोषणा देत जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी जामनेर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महसूल विभागाचे तलाठी, ग्रामसेवक व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आज दि. १४ पासून संपाचे हत्यार उपसून बेमुदत संपावर गेले आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करणे, मागासवर्गीयांच्या रीक्त जागा भरणे या प्रमुख मागण्यासांठी कर्मचारी सहभागी झाले आहेत. कुठलेही शासकीय काम न करता मोठ्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी झाले आहे.

बेमुदत संप पुर्णपणे यशस्वी होण्यासाठी जामनेर तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी हजेरी लावून “आता नाही तर कधीच नाही” , “पेंशन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बाप्पाची” , “कोण म्हणतो देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही” अशा घोषणा दिल्या. संपासाठी कर्मचारीवर्ग जामनेर पंचायत समितीच्या प्रवेशद्वारासमोर जमले होते होते.

Leave A Reply

Your email address will not be published.