वरणगाव समांतर महामार्गासाठी वाढीव निधिची मागणी…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

वरणगाव शहरातील समांतर रस्ता, दुभाजक, चौकातील तिरंगा झेंड्याभवती विद्युत रोषणाई व जुन्या महामार्गावरील जिर्ण झालेल्या पुलाच्या उभारणीसाठी वाढीव निधी मंजूर करवा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनाच्या माध्यमातून सुनिल काळे यांनी केली.

निवेदनात शहरातून जाणाऱ्या फुलगाव ते साई मंदिरा पर्यंतच्या मार्गावर समांतर रस्ता होऊन त्यामध्ये दुभाजक टाकून, पथ दिवे लावण्यात यावे, बस स्थानक चौकातील तिरंगा झेंड्याच्या सभोवताली विद्युत रोषणाई करण्यात यावी व या मार्गावरील जुनाट झालेल्या पुलासाठी निधी देण्यात यावा. यापुर्वी आपण या रस्त्यासाठी निधी दिला होता मात्र तो कमी पडत असल्याने या कामासाठी वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा असे मंत्री नितिन गडकरी यांना दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी डॉ राजेंद्र फडके व सुनिल काळे यांनी भेट घेत निवेदन दिले. सदर रस्ता हा नगर परिषदेकडे वर्ग न करता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावा अशी मागणीही यावेळी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.