शिवचरित्र हे समाज मनावर एक उत्तम संस्कार – गिरीश महाजन

0

जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क

“श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ, हातात धरली तलवार छातीत भरले फोलाद, धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य हे आपले महाराज” हिंदवी स्वराज्य संस्थापक युगप्रवर्तक अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या बळावर अफाट असे हिंदवी स्वराज्य व साम्राज्य उभे केले. लोककल्याणकारी राजे शिवबा हे अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. या शुभ दिवशी तितकाच राजमाता जिजाऊ आईसाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा महत्वपूर्ण क्षण असतो. राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांनी आपला लढाऊ बाणा व शौर्य संस्कार देऊन त्यांनी महाराजांची जडणघडण केली.

ज्यामुळे कोट्यावधी नागरिकांचे व या राष्ट्राचे देखील भाग्य बदलले. एक जिजाऊ ही संपूर्ण राष्ट्राचा उद्धार करू शकते. याचे जातीवंत व सत्य उदाहरण म्हणजे स्वराज्य संस्थापिका राजमाता जिजाऊ मॉसाहेब व आदर्शवादी राजे छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत.शिवराय हे मुत्सद्दी आणि नितीमान राजे होते. त्यांचा इतिहास जसा व धैर्याचा आहे. तसेच महाराजांनी रणांगणावर चालविलेली तलवार त्याच बरोबर त्यांची न्याय व्यवस्था राजनिती तसेच त्यांनी केलेला शासन प्रणालीचा अवलंब शिवरायांनी स्थापन केलेले राज्य केवळ एका जाती धर्माचे नसुन गोरगरीब रयतेचे होते. छत्रपती शिवाजीराजे कुणा धर्माच्या विरोधात नव्हते तर गुलामगिरी व परकिय आक्रमणांच्या विरुद्ध होते. त्यांनी राज्यात कधीही भेदभाव केला नाही. तर ते उपेक्षित गोरगरीब वर्गाबाबत अत्यंत कनवाळू होते. समाजातील कष्टाळू शेतकरी मजुर यांच्या सह अनेक श्रमदायी जनतेला घेऊन चालले. आणि विशेषत सर्व जाती धर्माचा आदर याचे जातीवंत व सत्य उदाहरण म्हणजे “पर स्री हि माते समान” कल्याणच्या सुभेदाराची सुनेला दिलेली मानपुर्वक रवानगी होय. असे राज्याचे ग्रामविकास पंचायती राज व वैद्यकीय शिक्षण तथा युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवजयंती निमित्त ढोलताशांच्या गजरात व पारंपारिक वेशभुषा परीधान करीत विद्यार्थीनी, बाल शिवाजी, मावळे, यासह विद्यार्थ्यांच्या निघालेल्या भव्य शिवस्रुष्टी रॅलीने नागरीकाचे लक्ष वेधुन घेतले. शहरातील नगरपालिके जवळ राजमाता जिजाऊ मॉसाहेब चौकात भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवरायांच्या नावाने जामनेर शहर दणाणुन गेले होते. हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्यावेळी खा. रक्षाताई खडसे, नगराध्यक्षा साधना महाजन, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, मुख्याधिकारी-चंद्रकांत भोसले, नगरसेवक बाबुराव हिवराळे, आतिश झाल्टे, अनिस शेख, उल्हास पाटील, सुहास पाटील, शिवाजी सोनार, माजी सरपंच शंकर मराठे, नितीन झाल्टे, दिपक पाटील, विवेक पाटील, कैलास पालवे, विजय शिरसाठ, गणेश चौधरी, यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.