शाहीर शिवाजीराव पाटील यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडा

0

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवरायांचा धगधगता इतिहास शिवशाहीर शिवाजीराव पाटील यांनी दि १८ रोजी सायंकाळी ७ वाजता येथील नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालयातील प्रांगणात रयत सेना आयोजित शिवजयंती निमित्त कार्यक्रमात मांडला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आ. मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील,डॉ जयवंत देवरे, राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अविनाश देशमुख भाऊसाहेब पाटील, एस पी ठाकरे, महेश चव्हाण,उद्योगपती राज पुंशी ,प स मा. सभापती संजय पाटील, मा नगरसेवक नितीन पाटील,रामचंद्र जाधव, दीपक पाटील, घृष्णेश्वर पाटील, सोमसिंग राजपूत,रोशन जाधव, सदाशिव गवळी , संगीता गवळी, अंकुर संघाच्या प्रा डॉ साधना निकम,ॲड राहुल जाधव,ॲड धीरज पवार,मुकुंद पाटील,धुळे येथील शिवज्ञा प्र अध्यक्षा अश्विनी पवार,ॲड रवींद्र पवार,इंजि दिपक निंबाळकर, अनिल ठाकरे ,विलास गवळी, छगन जाधव, गोकुळ पाटील, खुशाल बिडे, गोरख साळुंखे, दीपक राजपूत,मनोज भोसले, नाना शिंदे ,सतीश पवार, बाळासाहेब पवार ,योगेश पाटील, चेतन वाघ ,आर बी जगताप, प्रा चंद्रकांत ठाकरे, स्वप्निल जाधव, अरुण पाटील, मनोहर सूर्यवंशी, निलेश पाटील, सुधीर पाटील, संजय वाघ, पत्रकार एम बी पाटील ,रामलाल चौधरी, स्वप्निल वडनेरे ,आनंद गांगुर्डे, ,विजय पवार,सुनील पवार,दिलीप पवार,वंचित ब आघाडी शहरअध्यक्ष सागर निकम उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते त्यांनी सर केलेले गडकिल्ले त्यांच्या लढ्या मावळ्यांचे शौर्य राष्ट्रमाता जिजाऊ यांनी त्यांना दिलेले संस्कार ते त्यांच्या जीवनातील सर्व शौर्याच्या गाथा व अंगावर काटा आणणारा शिवरायांचा धगधगता इतिहास शिवशाहीर शिवाजीराव पाटील यांनी पोवाड्यातून मांडून उपस्थित शिवभक्तांची मने जिंकली यावेळी त्यांना त्यांचे सहकाऱ्यानी साथ दिली. यावेळी मोठ्या संख्येने पोवाडा ऐकण्यासाठी शिवभक्त उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजन झाल्यानंतर जळगावचे आर्य महेश पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर गारद दिली , शिवगर्जना आयुष गांगुर्डे यांनी दिली,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर शालेय विद्यार्थिनी तनिष्का पवार, सिद्धी पवार यांनी भाषण केले.

याप्रसंगी भारतीय सैन्य दलातील आजी व माजी सैनिकांचा व सामाजिक कार्यकर्ते अल्लाउद्दीन शेख यांचा सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी रयत सेनेने आज पर्यंत केलेले कार्य विषद केले समाजाच्या न्याय व हक्कांसाठी यापुढे संघटना सामाजिक कार्यासाठी अग्रेसर राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमा अधिक परिश्रम पी एन पाटील ,पप्पू पाटील, प्रमोद वाघ,खुशाल पाटील, सचिन पवार ,ज्ञानेश्वर कोल्हे ,गोकुळ पाटील,आबासाहेब गरूड, संजय कापसे ,भाऊसाहेब पाटील,स्वप्निल गायकवाड ,देवेंद्र पाटील, दिनेश चव्हाण, दीपक देशमुख,प्रदीप मराठे, समाधान मांडोळे, मुकुंद पवार, भरत नवले, राजेंद्र पाटील, गौरव पाटील, सागर जाधव, विलास मराठे,रमेश पवार, ज्ञानेश्वर सोनार, सागर चव्हाण, कुलदीप पाटील, अमोल पाटील, विकास पवार, दीपक नागणे, इस्माईल भाई ,संतोष पाटील, विजय दुबे, मंगेश देठे,प्रशांत अजबे,दिलीप अहिरे, गजानन पावले आदींनी घेतले,तर रयत महिला आघाडीच्या रत्ना पाटील आशाबाई पाटील उपस्थित होते, सूत्रसंचालन रुपेश पाटील यांनी केले तर आभार सचिन पवार यांनी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.