पाचोरा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

0

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा शहरातील यावर्षी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय  वाघ व संजय  पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती साजरी करण्यात आली, शिवजयंती निमित्त आ.  किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ विक्रम बांदल, तहशिलदार कैलास चावडे, माजी आमदार दिलीप वाघ, ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे,नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रभारी पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे, नितीन तावडे, विकास पाटील, किशोर बारावकर,प्रा शिवाजी शिंदे,ए बी अहिरे, डॉ स्वप्निल पाटील, डॉ ग्रिस्मा पाटील,प्रा सुनिता मांडोळे, सुवर्णा पाटील,उज्वला महाजन,जरोज बावा, सुनील पाटील, उद्धव मराठे, पप्पू राजपूत, मुकेश तुपे, किशोर डोंगरे,जिभाऊ पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले.

संपूर्ण पाचोरा शहर गेल्या दोन दिवसांपासून भगवे पताके, झेंडे लावून भगवेमय करण्यात आले होते, अनेक लाहन बालकांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पारंपारिक वेश परीधान करून त्यांची घोड्यावर व ट्रॅक्टर मधून मिरवणूक काढण्यात आली, अनेक शिवप्रेमी महिला युवक युवती व युवकांनी भगवे फेटे परिधान करून मिरवणुकीत ढोल ताश्याच्या गजरावर ताल घरला, रॅलीत,श्री गो से हायस्कूल, वर्ड स्कूल,बुऱ्हाणी इंग्लिश मेडीयम,पी के शिंदे विद्यालय,नवजीवन विद्यालय,नविन माध्यमिक विद्यालय, शिंदे इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा ज्योतिराव फुले स्मारक, रेल्वे स्टेशन रोड, देशमुखवाडी, सराफ बाजार, गांधी चौक, जामनेर रोड मार्गे शिवाजी महाराज चौकात आणून विसर्जित केल्यानंतर या ठिकाणी विविध शाळांतील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ व शिवाजीराजे भोसले यांच्या जीवनावर आधारित पोवाडे व त्यांचे विचार मांडले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सुमारे २०० युवकांनी पाचोरा महाविद्यालय जामनेर रोड, भुयारी मार्ग, शिवाजी चौक, एस. टी. स्टँड रोड, जारगाव चौफुली पर्यंत रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिद्धीविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. ग्रिश्मा पाटील यांनी बालकांसाठी मोफत दुध वाटप केले. तर छत्रपती उदयनराजे भोसले गृप तर्फे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. जयंतीत धनराज पाटील, एस. के. पाटील, मुजाहिद खान, सयिद पंजाबी, फयीम मनियार, रसीद बागवान, विजय जाधव, सुखदेव गिते, बी. एन. पाटील सह मोठ्या संख्येने शिवभक्त सामिल झाले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.