मधुमेहावर गुणकारी जांभळाच्या बिया

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जांभळाचे आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्व सांगितले गेले आहे. जांभळाचा उपयोग अनेक प्रकारची आयुर्वेदिक औषध बनविण्यासाठी करण्यात येतो. जांभूळ हे फळ मुतखडा, मधुमेह, अतिसार, मुरडा, संग्रहणी, यकृत विकार आणि रक्तजन्य विकारात अत्यंत उपयुक्त आहे.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभळाच्या बियांचे चूर्णाच्या स्वरूपात देणे एक सर्वोत्तम उपाय मानला जातो. जांभळाच्या बियांमध्ये अनेक प्रकारचे आरोग्यदायी
घटक असतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच अनेक प्रकारचे हानिकारक केमिकल्स शरीराबाहेर फेकण्यास जांभळाच्या बियांचा उपयोग होतो. जांभळामध्ये असलेल्या अल्कोलिड्स केमिकलमुळे स्टारचे साखरेत रूपांतर होण्यास आळा बसतो. आणि म्हणूनच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राखण्यास मदत होते.

जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर करा आणि दिवसातून तीन वेळा खा. मधुमेहावर हा अत्यंत उत्तम उपाय आहे. दूध किंवा पाण्यासोबत ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी घ्या, त्यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो. मधुमेहासोबतच रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे. एका अभ्यासानुसार जांभळाच्या बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब ३४ टक्क्यांनी कमी होतो. त्यात असणाऱ्या अँटी ऑक्सिडंट्समध्ये रक्तदाब विरोधी गुणधर्म असतात.

संकलन –संयोजन
सुबोध रणशेवरे
संपर्क -९८३३१४६३५६
इमेल -subodh.ranshevre @rediffmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.