पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्हयाची खरीप हंगाम नियोजन बैठक २०२२ ना. गुलाबरावजी पाटील मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तथा पालकमंत्री जळगाव यांचे अध्यक्षतेखाली आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे संपन्न झाले. बैठकीचे आयोजन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांचे मार्फत करण्यात आले. सदर बैठकीस खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. जळगाव यांच्यासह कृषि, पशुसंवर्धन, पणन, जिल्हा उपनिबंधक, मत्सव्यवसाय, भुजल सव्हेक्षण, पाटबंधारे, म.रा.वि.वि. कंपनी जिल्हा अग्रणी बँक, पिक विमा कंपनी प्रतिनिधी, कृषि विज्ञान केंद्र व कृषि विदयापिठाचे शास्त्रज्ञ इ. जिल्हयातील सर्व शासकीय विभागाच अधिकारी उपस्थित होते.

नियोजन बैठकी दरम्यान सन २०२२-२३ या वर्षातील खरीप हंगामाचे नियोजन संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी सादर केले. जळगाव जिल्हयाचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ७,६६,८७७ हेक्टर असून येत्या खरीप हंगामात ७,५३,९०० (७३ %) हेक्टर क्षेत्र प्रस्तावीत आहे. जळगाव जिल्हयात कापुस हे महत्वाचे नगदी पीक असल्याने ५,५०,००० हेक्टर क्षेत्रावर संभाव्य लागवड होण्याची शक्यता आहे. यामुळे तृणधान्य (२५-६६१%), कडधान्य (१९-६१%) सुर्यफुल वगळता गळीतधान्य (२९-७७%) पिकांचे क्षेत्रात होणार आहे. कापुस पिकाचे लागवडीसाठी २७,५०,०००/- (१२,११९ क्विं.) पाकीटे मागणी करण्यात आली आहे.

दरवर्षी कापुस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा होणारा वाढता प्रादुर्भाव पहाता या वर्षीही पूर्व हंगामी कापसाची लागवड टाळुन १ जुन पासुनच लागवड करण्याचे आदेश कृषि आयुक्तालया मार्फत प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे १३.७२५ हेक्टर क्षेत्रावर होणारी सोयाबीन पिकाचा लागवड पाहता एकुण आवश्यक १३,७२५ क्विंटल बियाणेपैकी महाबीज १५०० क्विं., राष्ट्रीय बीज निगम – १००० क्वि. खाजगी कंपन्या ५३८३ व उर्वरित ५८४२ क्वि सोयाबीन बियाणे ग्रामबिजोत्पादनाव्दारे उत्पादित बियाणे मार्फत उपलब्ध होणार आहे. कापूस व सोयाबीन पिकासह ज्वारी, बाजरी, तुर, मुग, उडीद, सका, भुईमुग, सूर्यफल, तोळ इ. पिकांसाठी एकूण ३८,९६८ क्विं. बियाणे उपलब्ध होणार आहे.

खरीप हंगामासाठी ग्रेडनिहाय खतांची (युरिया, डीएपी, एसएसपी, म्युर्ट ऑफ पोटॅश व एनपीक) एकुण मागणी ३,८६,४९४ मे. टन असुन एकुण ३,३५,०१० मे. टन आवंटन मंजूर झाल आहे. खरीप हंगामासाठी युरिया ७६६० मे टन व डीएपी १७६० मे टन संरक्षित साठयाचे नियोजन करण्यात आले आहे.

येत्या खरीप हंगामात कृषि विभागा मार्फत पुढील प्रमाणे ४ मोहीम राबविण्यात येत आहे.

१) बियाणे उगवण क्षमता चाचणी:- जिल्हयात बियाणे उगवण क्षमता चाचणी घेणेबाबत प्रचार व प्रसिद्धी मोहिम राबविण्यात येत असून यात मुख्यतः सोयाबिन, उडीद व मूग बियाण्यांचा समावेश करण्यात येत आहे. सदर मोहिमेसाठी शेतीशाळा, ग्रामस्तरावरील सभा, प्रशिक्षण, मेळावे, चर्चासत्र, पिक प्रात्यक्षिके, बोर्ड, फ्लेक्स, माहिती पत्रके, आकाशवाणी जिंगल्स, वर्तमानपत्र, शेतकरी मासिक, मोबाईलद्वारे (शेतकरी व्हाटसअप ग्रुप, कृषि विभागाचे युटुब चैनल, फेसबुक या माध्यमांद्वारे शेतक-यांना बियाणे उगवण क्षमता चाचणी घेऊनच पेरणी करण्याबाबत कृषि विभागातील क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी यांचेमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

२) बीज प्रक्रिया मोहीम:- खरीप हंगाम व रब्बी हंगामातील सर्व पिकांच्या बियाण्याला जिवाणूसंवर्धन व रा. बीजप्रक्रिया ही मोहिम प्रात्यक्षिक प्रशिक्षण, व्हार्ट अप्स इ. माध्यमातून राबविण्यात येत असून प्रत्येक तालुक्यात कमीतकमी १० टक्के गावात म्हणजेच जिल्हयात एकुण १५० गावात १०० टक्के बीजप्रक्रीया करण्याचे प्रस्तावित आहे.

३) खत बचत मोहीम:- युरोया, पोटॅश व सिंगल सुपर फॉसफेट या सरळ खतांचा वापर करुन घरच्या घरी खते तयार करणे, फळपिके व ऊस पिकासाठी यूरिया खताचा वापर कमी करुन नॅनो युरीयाचा वापर वाढविण्याबाबत संबंधित कृषि विदयापिठाच्या पिक निहाय जमीन आरोग्य पत्रिका आधारीत शिफारस केलेल्या खताच्या मात्रा मिळण्यासाठी “कृषिक” या मोबाइल अॅप मधील गणकयंत्राचा वापर करण्यासाठी प्रशिक्षण, मेळावे, शेतीशाळा, वृत्तपत्र, शेतकरी व्हॉटसअप ग्रुप यांचेमार्फत प्रचार व प्रसिध्दी इ. कार्यक्रम राबविले जात आहे.

४) शेतीशाळा मोहीम:- विविध योजनांतर्गत जिल्हयात एकुण २३५ शेतीशाळा राबविण्यात येणार असून यामध्ये ७० शेतीशाळा महीलांसाठी राबविण्यात येणार आहे. शेतीशाळेच्या माध्यमातुन किडीच्या नैसर्गीक शत्रुचे अर्थात मित्र किटकांचे संवर्धन करणे, नियमीत पण निरीक्षणे घेऊन शेतक-यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करणे, एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन व शेतकरी समुहाने एकत्र येऊन गरजेवर आधारित कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

याप्रसंगी मा.पालकमंत्री महोदय यांचे शुभहस्ते “रासायनिक खतांचा संतुलीत वापर व पर्यायी खतांचा वापर” बाबत चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवुन कृषि प्रदर्शनाचे देखील उद्घाटन करण्यात आले.

या व्यतिरीक्त दि. ०२ मे २०२२ रोजी नाशिक येथे मा राज्यपाल महोदय यांचे शुभहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेल्या जिल्हयातील ३ शेतकऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये समाधान दयाराम पाटील कृषि भूषण २०१७, अनिल जिवराम सपकाळे- कृषि भूषण (संद्रिय शेती) २०१८ व रविंद्र माधवराव महाजन उदयानपंडीत १०१७ यांचा पालकमंत्री यांचे हस्ते सत्कार झाला.

तसेच अनिल वसंतराव भोकरे, कृषि उपसंचालक, (जिअकूअ कार्यालय जळगाव), दिनेश देविदास पाटील, कृषि सहाय्यक (कृषि चिकोत्सालय चोपडा) व सचिन अशोक पाटील, कृषि सहाय्यक (जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी कार्या, जळगाव) यांना मा. पालकमंत्री यांचे हस्ते सन २०२१-२२ या वर्षात राबविण्यात आलेल्या राज्यस्तरीय शेतीशाळा क्षमता बांधणी प्रशिक्षण बेबिनार मालीकेतील योगदानाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.

त्याचप्रमाणे सन २०२१-२२ या वर्षात राबविण्यात आलेल्या विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा आढावा व सन २०२२-२३ या वर्षात विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजना राबविण्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.