‘बुढ्ढा सटिया गया है’ म्हटलं तर खडसेंना.. – जळकेकर महाराज

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्यातील शाब्दिक वार आता रस्त्यावर आला आहे. या आरोप प्रत्यारोपाने जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे आकाशवाणी चौकात मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला काळे फासून निषेध व्यक्त करण्यात आला. त्याच धर्तीवर भाजप गटाच्या वतीने आकाशवाणी चौकातच मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून राष्ट्रवादी काँग्रेसचा कृत्याचा निषेध व्यक्त केला.

दरम्यान माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने टॉवर चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी आ. एकनाथराव खडसेंवर चांगलाच शाब्दिक वार केला. यावेळी ते म्हणाले की, “खडसे हे स्वत:ला जेष्ठ नेते म्हणवतात आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करतात. आपण आपल्या ज्येष्ठतेनुसार वक्तव्य करावं, तुम्हाला “बुढ्ढा सटीया गया है” असे म्हटलं तर बरं वाटेल का ? असा सवाल करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.