मनवेल तलाठी सजेला तलाठी आप्पा येणार कधी ?

0

मनवेल , लोकशाही न्युज नेटवर्क 

यावल तालुक्यातील मनवेल येथील तलाठी कार्यालयाचा कारभार गत चार वर्षापासून प्रभारीवर सुरू आहे. तलाठी कार्यालयात कायमस्वरूपी तलाठी नसल्याने नागरिकांना अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, वेळेवर कामे होत नसल्याची ओरड आहे. गावकरी अद्यापही कायमस्वरूपी तलाठ्याच्या प्रतीक्षेत आहेत. “जिल्हाधिकारी  साहेब.. मनवेल गावाला तलाठी देता का?” अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना करावी लागत आहे.

मनवेलसह परिसरातील दगडी, पिळोदा खुर्द, थोरगव्हाण आदी गावांचा समावेश आहे. यापूर्वी मनवेल  गावातील तलाठी कार्यालयाचा कायमस्वरूपी पदभार सांभाळणारे तलाठी स्वपनिल तायडे यांची बदली होऊन चार वर्ष झाली आहे. तेव्हापासूनच अर्थात चार वर्षापासून तलाठी कार्यालयाचा कारभार प्रभारीवर आहे. सध्या  साकळी  येथील तलाठी व्हि.एस.वानखेडे यांच्याकडे मनवेल तलाठी कार्यालयाचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे.

ग्रामस्थांची प्रतिक्रिया 

कारभार प्रभारीवर असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.  मनवेल गावाचा महसूल क्षेत्राचा व्याप मोठा असून या सज्जात परिसरातील चार गावांचा कार्यक्षेत्रात केळी लागवड, कापुस, विमा करीता ७/१२ उतारा, खातेउतारा ऑनलाइन नोंदणीकरिता सातबारा तसेच नानाविध कामांसाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात चेकरा माराव्या लागत असून कामेही खोळंबत आहेत. समस्या लक्षात घेता तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी तत्काळ मनवेल साजेल स्थायी तलाठी नियुक्त करण्याची मागणी  ग्रामस्थांनी केली आहे.

तलाठी कार्यलयाचा दर्शनी भागात तलाठी आप्पा, मंडळधिकारी यांचा भ्रमनध्वनी क्रमांक, नाव व कार्यलयात येण्यासाठी वेळ दर्शनी भागात लिहणे गरजेचे आहे. येथील प्रभारी तलाठी व्हि.एस.वानखेडे कार्यालयात फिरकूनही पहात नाही. येथील सजेचे कोतवाल यांना चारही गावातील महसूल जमा करणे, शेतकऱ्यांचे ७/१२ साकळी येथून आणणे सह विविध प्रकारचे कामकाज पहाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

यावल तहसिल कार्यलयातील सामाजिक अर्थ सहाय्यक अनुदान घेत असलेल्या लाभार्थाना हयातीचे दाखले, आधार लिंक, बँक पासबुक झेराक्स व आधार कार्ड  झेराक्स जमा करण्यासाठी लाभार्थानी तलाठी कार्यलयात जमा करण्याचे आवाहन तहसिलदार यावल यांनी केली असल्यामुळे वयोवृध्द नागरीकांची पायपीट होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.