जळगाव येथे वास्तव्यास असलेल्या व्यापाऱ्याचे मलेशियात अपहरण झाल्याचा संशय !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथे वास्तव्यास असलेले आणि पावणेदोन वर्षांपासून मलेशियात गेलेले चॉकलेट उत्पादक तथा व्यापारी जयकुमार रतनानी (वय ४०) यांचे मलेशियात अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीयांकडून व्यक्त केला जात आहे. रतलानी कुटुंबीयांनी खासदार उन्मेष पाटील व जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्याकडे आपबिती कथन केल्याने भारतीय दूतावासामार्फत रतनानी यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

जयकुमार रतनानी पाचोरा येथील मूळ रहिवासी असले तरी त्यांनी काही वर्षे जळगाव येथे चॉकलेटचा व्ययसाय चालविला. त्यानंतर ते पावणेदोन वर्षांपूर्वी मलेशियात व्यापारासाठी गेले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या २२ ऑक्टोबरला त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ‘मी कार्यक्रमात आहे, नंतर बोलतो’, असे संभाषण झाले होते. त्यानंतर मात्र त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही.

त्यांच्या पत्नी भाविका यांनी पती जयकुमार यांच्याशी बोलण्यासाठी अनोळखी दोन मोबाईल क्रमांकावरून फोन आले व त्यांनी रतनानी यांच्याशी बोलण्यासाठी बँक खात्यात पैसे टाकण्याचे सांगण्यात आल्याचे स्पष्ट केले व पतीचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

त्यामुळे भाविक रतनानी यांच्यासह कुटुंबीयांनी खासदार उन्मेष पाटील व जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्याकडे कैफियत मंडळी असता खासदार पाटील यांनी केंद्रीय मंत्रालयाबाबत मलेशियातील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. तसेच जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी भारतीय उच्चयुक्त आयोगाच्या समुपदेशकांशी संपर्क साधून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करून रतलानी यांचा शोध घेण्यासंदर्भात प्रयत्न चालवले आहेत. दूतावासाच्या माहितीनुसार मलेशियातील कोणत्याही पोलीस ठाण्यात रतनानी यांचे अपहरण झाल्यासंदर्भात नोंद नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रतनानी यांच्या बेपत्ता प्रकरणी गुंतागुंत वाढली असून, रतनानी कुटुंबीय कमालीचे चिंताग्रस्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.