जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शेळगाव (ता.जळगाव) येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवार (दि.२) रोजी ९ च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार (दि. ३) सायंकाळी नशिराबाद पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेळगाव येथील मिथुन सुरेश कोळी (वय ३६) या तरुणाला गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयित दीपक संजय कोळी, निलेश बाळू कोळी, खुशाल बाळू कोळी, आणि संजय रघुनाथ कोळी (सर्व रा. शेळगाव) यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच एकाने हातातील काठी मिथुनच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, जखमी मिथुनला जळवळील नशिराबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, उपचारानंतर शुक्रवारी मिथुन कोळीच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहेत.