भुसावळ रेल्वे मंडळाला १२० कोटींचा महसूल मंजूर

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ विभागाचे विभागीय रेल व्यवस्थापक इति पांडे यांच्या मार्गदर्शनानुसार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग यांच्या सक्षम नेतृत्वाखाली वाणिज्य विभागाने ऑक्टोबर २०२३ चा महसूल एकूण १२० कोटी ९६ लाख इतका विभागाने मिळवला आहे.

त्यात प्रवासी वाहतुकमधून एकूण महसूल ६७ कोटी ९३ लाख, माल वाहतुकीमधून ४३ कोटी ५४ लाख, पार्सल वाहतुकीतून ७ कोटी २८ लाख रुपये, तिकीट तपासणीत एकूण ७४ हजार केसेस केल्या.

त्यातून तिकीट तपासणीचा ५ कोटी ६४ लाख रुपये प्राप्त झाले. पार्किंगमधून ५४ लाख ३३ लाख, वाणिज्य प्रसिद्धीतून २७ लाख ७० हजार, खानपान विभागाकडून ९१ कोटी ५५ लाख, भासवलं वाणिज्य विभागाची फुटकर राशी ४८ कोटी २२ लाख आहे. बोदवड स्टेशन येथे पादचारी पुलाचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच तो सुरू होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.