जळगावातून दीड लाखांची रोकड चोरली

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
कारच्या मागच्या सीटवरून दीड लाख रूपये ठेवलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली असून रात्री उशीरा रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, कनकमल उत्तमचंद राका (वय-६८) रा. हॉटेल रॉयल पॅलेसमागे जय नगर, जळगाव राहत असून ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरी जात असतांना त्यांच्या कारचे टायर पंक्चर झाल्याने ते ते सागर पार्कसमोरील पेट्रोल पंपाजवळ पंक्चर काढण्यासाठी आले. त्यांनी कारच्या मागच्या सीटवर दीड लाख रूपये असलेली पिशवी ठेवलेली होती. पंक्चर काढत असतांना कारमधील सीटवरून दीड लाख रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटन घडली. याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून ९ रोजी रात्री उशीरा रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.