ट्विटरवर “ब्लू टिक” असलेल्यांना पैसे मोजावे लागणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्यातरी ट्विटरचा (Twitter) ताबा आता एलोन मस्क (Elon Musk) यांच्याकडे आहे. त्यामुळे मस्क बरेच असे बदल ट्विटर मध्ये केले आहे. यांनी कंपनीचं उत्पन्न आणि खर्च कमी करण्यासाठी काही पावलं उचलली आहे. मधल्या काळात कर्मचारी कपातीचा मुद्दाही चांगलाच गाजला होता. त्यानंतर ट्विटर युजर्संना वेगवेगळ्या रंगाचे टिक देण्यासोबत सब्सक्रिपशन मॉडेलही लाँच केलं होतं. मात्र भारतीय युजर्सकडून पैसे घेण्याबाबत अजूनही साशंकता होती.मात्र आता ब्लू टिक असलेल्यांना पैसे मोजावे लागणार आहे.मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरनं गुरुवारी भारतीय युजर्संना ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठीचं पॅकेज जाहीर केलं आहे.भारतासह जगातील 15 देशांना ट्विटरवरील ब्लू टिकसाठी पैसे भरावे लागणार आहे. ब्लू टिक सब्सक्रिप्शन यूएस, कॅनडा, जापान, युके आणि सौदी अरबमध्ये लागू आहे.भारतीय ट्विटर युजर्संना ब्लू टिकसाठी महिना 900 रुपये भरावे लागणार आहेत.अँड्रॉईड आणि अॅपल हँडसेट युजर्ससाठी ही किंमत सारखीच असेल.दोघांना 900 रुपयेच मोजावे लागणार आहेत.

कोणला कोणत्या रंगाचं टिक मार्क
ट्विटरनं श्रेणीनुसार अकाउंट्सना त्या त्या रंगाचं टिक मार्क दिलं आहे. सरकारी संस्थांना ग्रे टिक, कंपन्यांना गोल्ड टिक आणि सामान्य व्यक्तींना ब्लू टिक मिळणार आहे. या टिकवरूनच आता त्या त्या अकाउंट्सची ओळख होत आहे.

यापूर्वी ब्लू टिकचे काय नियम होते
तीन रंगांचे पर्याय उपलब्ध होण्यापूर्वी ब्लू टिक हा एकमेव पर्याय होता. अधिकृत खात्यांची शहनिशा करून ट्विटरकडून ब्लू टिक मिळायचं. यामुळे बनावट खाती ओळखणं सोपं व्हायचं. यापूर्वी सेलिब्रिटी, नेते, पत्रकार यांना त्यांच्या छबीनुसार ब्लू टिक मिळत होतं. मात्र आता ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ट्विटरने 2022 मध्ये ब्लू टिक सब्सक्रिप्शन मॉडेल आणलं होतं. तेव्हा अँड्रॉईड युजर्ससाठी 8 डॉलर्स आणि आयफोन युजर्ससाठी 11 डॉलर इतकं मासिक भाडे सांगितलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.