जळगाव केंद्रावर समन्वयकपदी संदीप तायडे…

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या 62 व्या मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी जळगाव केंद्रावर समन्वयक म्हणून रंगकर्मी संदीप तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या वर्षीच्या समन्वयकांनी राजीनामा दिल्याने नवीन समन्वयक कोण होईल? याकडे सर्व रंगकर्मींचे लक्ष लागून होते. अखेरीस आज परिपत्रकाद्वारे सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने संदीप तायडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.