ग्रामविकास अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमळनेर अनेक महिन्यांपासून वेळोवेळी अपंगांसाठी ५%  निधी संदर्भात पत्रव्यवहार केलेला असता  तात्कालीन ग्रामविकास अधिकारी संजीव साहेबराव सोनवणे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून शासकीय कर्मचारी यांना शासनाचे पाच लाख रुपये अनुदान मिळतं. शासकीय कर्मचारी म्हणून अशा लाभार्थ्यांना त्यांनी ५% मधून  १०५५० रुपये मालमत्ता करात सवलत देण्यात आली होती.

प्रहार संघटनेकडून याला विरोध दर्शविण्यात आला होता, परंतु आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ दिल्याप्रकरणी प्रहार संघटनेच्या वतीने तक्रार केली होती. या तक्रारीवर विस्तार अधिकारी यांनी अहवाल सादर करून गटविकास अधिकारी यांना निलंबित करण्याचा अधिकार  असतानाही त्यांनी जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला. परंतु जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल न घेता त्यांना सरळ सोडून देण्यात आले.  परंतु या संदर्भामध्ये अजून पाठपुरावा केला. व प्रहार संघटनेचे नामदार बच्चुभाऊ कडू यांनी देखील सीईओ यांच्याशी फोन वर संपर्क साधून वेळोवेळी चौकशी झाली पाहिजे. व दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मात्र जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल न घेता त्यांना विभागीय चौकशी लावण्यात आलेली होती.

परंतु सदरील ग्राम विकास अधिकारी मंगरूळ येथील ग्रामपंचायत विद्यमान म्हणून कार्यरत असताना पंधरा दिवसांत त्यांनी पुन्हा तोच पराक्रम केला. वेळोवेळी अनियमित काम करत असताना  दिव्यांगांच्या हक्काच्या निधीवर गदा आणली आहे. आणि त्या संदर्भात आज ६ जून रोजी प्रहार अपंग संघटना यांच्या वतीने जळगाव जिल्हा परिषद बाहेर दिव्यांग बांधवांच्या वतीने थाळीनाद आंदोलन छेडण्यात आले. जोपर्यंत विभागीय चौकशी पूर्ण होत नाही. तोपर्यंत सदर  ग्राम विकास अधिकारी यांना सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात यावे. व यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. अशी मागणी दिव्यांग प्रहार संघटनेचे अमळनेर तालुका अध्यक्ष योगेश पवार, जितेंद्र पाटील, नूरखान,आदींसह अन्य दिव्यांग बांधवांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.