आ. तानाजी सावंतांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे निदर्शन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

शिंदे गटाचे तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथे मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच यावेळी तानाजी सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगर महिला अध्यक्षा मंगला पाटील, वाल्मिक पाटील, सुमित पाटील, यशवंत पाटील, अमोल कोल्हे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.