जळगावच्या बस स्थानकातून दोन महिलांचे मंगळसूत्र लांबविले, गुन्हा दाखल

0

जळगाव– जामनेर येथे जाण्यासाठी बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने दोन महिलांच्या गळ्यातून पंचावन्न हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबविण्याची घटना २० ऑगस्ट रोजी जळगावच्या नवीन बस स्थानक येथे घडली .या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान रविवारी बस स्थानक परिसरात सोनसाखळ्या लांबविला याचा प्रकार घडल्याने पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतल्याचे समजते.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जामनेर शहरातील सुपारी बाग येथे राहणाऱ्या चाळीस वर्षीय भारती विनोद पाटील , आणि उर्मिला पाटील ह्या दोन्ही महिला 20 ऑगस्ट रोजी कामानिमित्त जळगावत आल्या असताना यानंतर त्या जामनेर बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र , आणि उर्मिला पाटील यांचे दहा हजार रुपयांचे मंगळसूत्र लांबविले .ही घटना दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास बापूराव पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.