पाचोरा शहरात अवैध दारू अड्ड्यावर धाड

0

पाचोरा. – पाचोरा तालुक्यात देखील गावठी हातभट्टी विक्री व निर्मिती करणाऱ्या विरोधात कारवाईचे धाडसत्र सुरू पाचोरा शहरातील भारत डेअरी बस स्टॉप जवळ एका गावठी दारू विक्रेत्याविरोधात कारवाई करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पाचोरा दारूबंदी विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील यांना शरद शेलार हा अवैधरित्या गावठी दारू विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता विलास पाटील व त्यांच्या पथकाने भारत डेअरी स्टाप जवळील शरद शेलार याचे दुकानावर छापा टाकला असता त्याचे ताब्यातील २ हजार १६० रुपये किंमतीची तयार पोटलीतील ४० लिटर गावठी असा मुद्देमाल जप्त करत शरद शेलार याचे विरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ नुसार कारवाई केली आहे. सदरची कारवाई पाचोरा येथील दारूबंदी विभागाचे दुय्यम निबंधक विलास पाटील, पोलीस कर्मचारी गिरीश पाटील तसेच नंदू पवार यांनी केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तसेच यापुढे ही असेच धाडसत्र सुरु ठेवणार असल्याचे विलास पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.