वडाळा शिवारातून दोन गाई चोरल्या

0

चाळीसगाव – तालुक्यातील वडाळा शेत शिवार मधून अज्ञात चोरट्यांनी साठ हजार रुपये किमतीच्या दोन गाई चोरून नेल्याची घटना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील वाघळी येथील शेतकरी गौरव माळी यांचे वडाळा शिवरात शेत गट क्रमांक 288 मध्ये शेत असून या शेतात बांधलेल्या प्रत्येकी 30 हजार रुपये किमतीच्या दोन गाई असा एकूण साठ हजार रुपयांचा गाई अज्ञात चोरट्यांनी 20 ऑगस्ट सायंकाळी सहा ते 21 ऑगस्ट सकाळी सहा वाजे दरम्यान चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्याने गौरव माळी यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.