प्रसिद्ध महिला डॉक्टराला अश्लील संदेश पाठवले; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील एका प्रसिद्ध महिला डॉक्टराला व्हाट्सॲपद्वारे एका व्यक्तीने अश्लील संदेश पाठवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील एका हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरांच्या व्हाट्सॲपवर अज्ञात व्यक्ती गेल्या २७ ऑगस्ट पासून २०२२ पासून अश्लील संदेश आणि व्हाईस कॉलिंग करून घाणेरड्या भाषेत बोलत होता. ८७८८६५ ८२७६ या अनोळखी क्रमाकांहून अज्ञात व्यक्ती महिला डॉक्टरला त्रास देत होता.

दरम्यान या त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरने याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली असून जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.