शाहूनगरात वादातून दगडफेक, सात जणांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

शाहूनगरात पैशांच्या वादातून दोन गटात वाद होवून दगडफेक झाल्याची घटना रविवारी २७ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी आज सात जणांविरुद्ध दगडफेक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव येथील यासीन नगरात परवेझ शेख सईद हे वास्तव्यास असून ते आठ ते दहा महिन्यांपुर्वी पिंप्राळा हुडको परिसरात राहायला आले होते. यावेळी ते बांधकाम ठेकेदार इद्रीस शेख इकबाल यांच्याकडे मिस्तरी काम करीत असतांना आगाऊ उचल म्हणून त्यांनी ४० हजार रुपये घेतले होते. त्यापैकी २५ हजार रुपये त्यांना परत दिले होते, परंतू सद्या परवेझ शेख सईद हे चाळीसगाव येथे राहत असून त्यांची सासरवाडी शाहू नगरातील असल्याने ते पत्नी व मुलांना घेण्यासाठी तेथे आले होते.

दरम्यान रविवारी २७ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास परवेझ शेख हे शाहू नगरातील ताज पान सेंटरजवळ राहणारे त्यांचे मामा शेख चाँद शेख सुपडू यांच्याकडे आलेले असतांना ठेकेदार इद्रीस शेख इक्बाल व त्यांच्यासोबत इतरांनी राहिलेले पैसे मागण्याच्या कारणावरून वाद होवून हाणामारी व दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत अस्लम शेख भिकन याच्या डोक्याला व हाताला, मुस्तकीम शेख मुक्तार याच्या नाकाला, फारुख शेख भिकन याच्या डोळ्याला तर मुक्तार शेख सुपडू यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

याप्रकरणी परवेझ शेख यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन इद्रीस शेख इक्बाल रा. पिंप्राळा हुडको, रहीम शेख अलाउद्दीन उर्फ पहेलवान, फहीम शेख करीम, मोईन शेख करीम, आरिफ शेख करीम, इम्रान शेख करीम, सुलतान शेख फिरोज रा. शाहुनगर यांच्याविरुद्ध दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.