गोडावून फोडून सोन्याचे दागिने लंपास; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील स्वातंत्र चौक येथील व्यावसायिकाच्या गोडावूनचा दरवाजाला असलेला कडीकोयंडा तोडून ५८ हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी

लंपास केल्याची घटना मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

स्वातंत्र्य चौकातील साईबाबा मंदिरासमोर मिरा आनंद जोशी या राहतात. घराच्या बाजूलाच त्यांचे सामान ठेवण्याचे गोडावून आहे. सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गोडावूनचा कडीकोयडा तोडून मधे प्रवेश केला. तसेच याठिकाणाहून चोरट्याने ३० वर्षापुर्वी खरेदी केलेले ५ तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, २ तोळ्याचा हार, ३ तोळ्याचे मंगळसूत्र, ७ ग्रॅम वजनाचे डुल व १ तोळ्याची सोन्याची चैन असा एकूण ५८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

सदर प्रकार मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आला. याप्रकरणी मिरा जोशी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून  अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.