धमकी देत मुलीला मारहाण; रोकडसह मोबाईलची जबरी चोरी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आईवडीलांना जीवेठार मारण्याची धमकी देत मुलीला मारहाण करून हातातील मोबाईल आणि २० हजाराची रोकड लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात रविंद्र काळू पाटील (वय ६३) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ते शेती करून आपला उदरनिर्वाह भागवतात. बुधवार ८ जून रोजी बी.जे. मार्केटमधील कौटुंबिक न्यायालयासमोर रविंद्र पंडीत पाटील याने रविंद्र काळू पाटील यांच्या मुलीला मारहाण करून तिच्या हातातील ९ हजाराचा मोबाईल आणि २० हजाराची रोकड जबरी हिसकावून चोरून नेला.

याप्रकरणी रविंद्र काळू पाटील यांनी जिल्हापेठ पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रविंद्र पंडीत पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वाघळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.