पुजारीकडून मंदीरात महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील एका भागात राहणारी महिला मंदिरात पुजेसाठी गेली असतांना पुजारीने अश्‍लिल वर्तन करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदर महिला त्यांच्या घराजवळ असलेल्या एका मंदिरात पुजेसाठी गेल्या होत्या. याठिकाणी पुजारीने महिलेकडे वाईट नजरेने बघत असल्याचे त्या महिलेने याबाबत पतीला देखील सांगितले होते. दरम्यान सोमवारी दि. २ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ती महिला मंदिरात पुजा करण्यासाठी गेली असता, याठिकणी राम बालकदास महाराज हे त्या महिलेजवळ आले. त्यांनी महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन त्या महिलेचा विनयभंग केला.

यानंतर महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून रामबालकदास महाराज यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.