अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अभिजित विनायक कोचूरे (वय २२, रा. महाविर नगर, दुध फेडरेशन) हा तरूण आई, वडिलांसह राहतो. दुचाकीने ते पहूर येथून जळगावकडे येत असतांना गाडेगाव येथील सुप्रिम पाईप कंपनीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ३ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली.

दरम्यान, त्याला तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील प्राथमिक तपास अनिल फेगडे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.