अज्ञात चोरट्यांनी एकाची दुचाकी लांबविली; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव; गोलाणी मार्केट येथून एकाची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल शिवाजी पाटील (वय-३३, रा. रायसोनी नगर, जळगाव) हा खासगी नोकरीला आहे. ४ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात आला. गोलाणी मार्केट परिसरात दुचाकी क्रमांक (एमएच ०९ एनआर ५०५७) क्रमांकाची दुचाकी पार्क करून लावली.

काम आटोपल्यानंतर विशाल पाटील हा तरूण दुपारी १ वाजता दुचाकीजवळ आला त्यावेळी दुचाकी जागेवर आढळून आली नाही. त्यांनी परिसरात व गोलाणी मार्केट पूर्ण शोधून काढली परंतु त्यांना कुठेही दिसून आले नाही.

अखेर जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली, त्यांच्या तक्रारीवरून शनिवार ५ मार्च रोजी दुपारी १ वाजता अज्ञात चोरट्यांन विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गजानन बडगुजर करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.