अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गावातील संशयित आरोपी भैय्या अवचित पवार याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना फूस लावून पळवून नेले आहे.

दरम्यान नातेवाईक घरी आल्यावर मुलगी कुठेही दिसून आली नाही. नातेवाईक व इतर ठिकाणी शोधशोध केली परंतू कुठेही मिळून आली नाही. अखेर त्यांनी सोमवार २१ फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन संशयित आरोपी भैय्या अवचित पवार याच्या विरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिंस शेख करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.