दिव्यांग बांधवांचे तहसिलदार यांना विविध मांगण्या संदर्भात निवेदन सादर

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 मलकापुर:-अपंग जनता दल सामाजीक संघटनाचे राज्य सचिव कलीम शेख, मनसे जिल्हाध्यक्ष (परीवहन) गजानन ठोसर यांचे मार्गदर्शना खाली अपंग संघटनेच्या वतीने तहसिलदार तथा नगर परीषद प्रशासक मलकापूर यांना एका निवेदन द्वारे दिव्यांगांच्या समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. ‌

निवेदनात नमूद केले आहे की,मलकापूर न.प द्वारा दरवर्षी आम्हा दिव्यांगांना 5% दिव्यांग कल्याण निधी गेल्या चार वर्षापासून मिळत आहे, सद्यस्थितीत न. प. चा कारभार चालविणारे सत्ताधारी यांचा कार्यकाल संपल्यामुळे न. प.चे प्रशासक म्हणून आपली नियूक्ती करण्यात आलेली असून, दर वर्षी प्रमाणे अर्थ संकल्पाच्या तरतुदि नुसार दिव्यांगाना चालू वर्षाचे सन  21-22 चा  5% निधी खर्च करण्यासाठी शासन निर्णयानुसार  मान्यता देण्यात यावी.

त्याचप्रमाणे संज्य गांधी निराधार, श्रावण बाळ योजने चे अनुदान दिव्यांग विधवा गोरगरीबांना 2ते 3 महीने अनूदान मिळण्याची प्रतिक्षा करावी लागते.या बाबत बॅंकाकडे विचारणा केली असता अधिकारीअसहकार्यचे धोरण  अपंगासोबत राबवितात.

आज रोजी एका बॅकेचे अनुदान जमा झाले तर दुसऱ्या बॅंकेत 20ते 25 दिवस लागतात,बॅंकेत अनुदान जमा न झाल्याने दिव्यांग व अनेक लाभार्थी बॅकांत जाऊन विचारणा करतात पण त्यांना बॅकेचे अधिकारी मानसिक व शारीरिक त्रास देऊन हाकलून लावतात अश्या मुजोर बॅक अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात तसेच  सदर अनुदान तहसिल कार्यालयाकडून किंवा बॅंकांकडुन वितरण करण्यास उशीर का होतो

याबाबत तात्काळ चौकशी करुन बेसहारा गरजु दिव्यांगांना अनुदान वेळेवर कालावधीत मिळावे आदी दिव्यांग बांधवांच्या समस्यांबाबत तहसिलदार राजेश सुरळकर साहेबांसोबत चर्चा करण्यात आली,यावेळेस दिव्यांग संगटनचे राज्य सचिव कलीम शेख, मनसे जिल्हाध्यक्ष (परीवहन)गजानन ठोसर,सादीक बागवान, शेख उसमान, अकील शाह, माजीद मसीहा, सै आसीफ, सचीन आगळे, नागेश सुरुंगे,शेख एजाज, गफूर चव्हाण सहअनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.