Saturday, January 28, 2023

महिलेवर धारदार शस्त्राने वार; चौघांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील तांबापूरा मच्छीमार्केट परिसरात महिलेवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील ताबापूरा परिसरातील मच्छी मार्केटजवळ अफसाना सलीम अन्सारी राहतात. शनिवार १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा हा शौचासाठी त्यांच्या घरासमोर असलेल्या नालीजवळ गेला होता. यावेळी सद्दाम खाटीक यांनी त्याला हाकलून लावले. अफसाना अन्सारी या त्यांना जाब विचारण्यासाठी गेल्या असता, सद्दाम खाटीक याच्यासह त्याचे वडील व भाऊ हे त्याना शिवीगाळ करु लागले. याचवेळी सद्दामच्या पत्नीने घरातून धारदार वस्तू आणून ती खाटीक यांच्या हातात दिल्याने खाटीकने महिलेच्या डोक्यावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले.

- Advertisement -

दरम्यान अन्सारी यांची जाउ अनवारी सलामी अन्सारी, सासू मेमुताबी ईमाउद्दीन अन्सारी, दिराणी समीता सलामी अन्सारी हे वाद सोडविण्यासाठी गेले असता, त्यांना देखील खाटीक यांची पत्नी, वडील अकिल खाटीक, भाऊ आशिस खाटीक यांच्याकडून लाथाबुक्क्यासह लाठीकाठीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी जखमी महिलेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे