Sunday, January 29, 2023

संबंध ठेवण्याची मागणी करत विनयभंग; वयोवृध्दावर गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील बळीराम पेठ भागात राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात ६१ वर्षीय वृद्धाविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

६१ वर्षीय वयोवृध्दाने महिलेला आपल्या सोबत संबंध ठेवण्याची मागणी करत जीवे ठार मारण्याची धमकी देत अंगलट करून विनयभंग केला.  शहरातील बळीराम पेठ भागात  ४२ वर्षीय महिला आपल्या परिवारासह राहते. त्या परिसरात राहणारा विजय विनायक काळकर (वय ६१) याने महिलेला १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घरी जात असतांना रस्त्यावर अडवून तिच्याकडे संबंध ठेवण्याची मागणी करत तिची ओढणी ओढत तिचा विनयभंग केला.

- Advertisement -

तसेच शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याच्या धमकीसह तू जर नकार दिला तर याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली. दरम्यान यावेळी नागरीकांना पाहून संशयित वयोवृध्दाने पळ काढला. यावेळी घाबरलेल्या महिलेने शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विजय विनायक काळकर याच्या विरोधात उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे