जिल्ह्यात नव्याने तब्बल 160 कोरोना बाधित

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 160 बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 281 जणांनी कोरोनावर मात केलीय. होम आयसोलेशन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 1915 इतकी आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98.18% इतका आहे. नवीन कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचं प्रमाण दुप्पट आहे.

असे आढळले बाधित

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण 160 कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात 34, जळगाव ग्रामीण 7 , भुसावळ 24, अमळनेर 4 , चोपडा 24, पाचोरा 2, भडगाव 1, एरंडोल 1, धरणगाव 6, जामनेर 28, रावेर 2, पारोळा 1, चाळीसगाव 8, मुक्ताईनगर 13, बोदवड 5, आणि इतर जिल्ह्यातील 4.

Leave A Reply

Your email address will not be published.